उजनी धरणाचे पाणी धुबधुबी प्रकल्पात आणू : आ. सुभाष देशमुख

दक्षिण तालुक्यात विकासकामांचा शुभारंभ

सोलापूर : राज्यात सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून या दुष्काळाच्या समस्येला संधी मानून शासनाची “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” ही योजना राबविल्यास धुबधुबी प्रकल्पातील गाळ काढुन शेतात टाकल्यास शेतीचा पोत सुधारणार आहे शिवाय प्रकल्पातील पाणीसाठा देखील वाढणार आहे. आगामी काळात उजनी धरण भरल्यास निश्चित प्रकल्पात पाणी सोडून धुबधुबी प्रकल्प भरण्यात येईल अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते होटगी यत्नाळ, होटगी मद्रे, होटगी औज या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिरवळ ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कारही आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी शिरवळ मठाचे सोमनिंग महाराज, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामाप्पा चिवडशेट्टी, भारतीय किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, शिवानंद महाराज, नागय्या स्वामी, यतीन शहा, गौरीशंकर मेंडगुडले, अतुल गायकवाड, आप्पासाहेब मोटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी धुबधुबी सांडव्यावर पूल बांधून देणे शिरवळ करजगी रस्ता डांबरीकरण करून देणे, होटगी मद्रे रस्त्यावर रेल्वे अंडरपास करून देणे आदी मागण्या नागरिकांनी निवेदनाद्वारे आमदार देशमुख यांच्याकडे केली सर्व मागण्या लवकरच मार्गी लावू असे आश्वासन आ.देशमुख यांनी दिले या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *