गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिकचे मोफत पोटाचे विकार तपासणी शिबिर

सोलापूर : सोलापूरातील गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिक
रोहन कॉम्प्लेक्स, जुना आरटीओ ऑफिस रेल्वे लाइन्स येथे मंगळवार दि. 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत पोटाचे विकार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ अभिजीत चिंचोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      सध्या पोटाचे विकाराचे प्रमाण वाढले आहे. अपेंडिक्स, स्वादुपिंड ,आतड्यांचे, लिव्हरचे विकार वाढत आहेत. बरेच रुग्ण अंतिम क्षणी उपचारासाठी येतात त्याकरिता समाजात जनजागृती होऊन निदान वेळेत व्हावे यासाठी या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, कॅन्सर, लिव्हर शस्त्रक्रिया ट्रॉमा शस्त्रक्रिया या सर्व शस्त्रक्रिया कमी दरामध्ये व योजनेमध्येही या शिबिरामध्ये करण्यात येणार आहेत असे डॉ.अभिजीत चिंचोळी यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *