दिव्यांगदिनी प्रहार दिव्यांगानी सोलापूरात केले चक्का जाम आंदोलन…

सोलापूर : ३ डिसेंबर दिव्यांगदिनाच्या दिवशीच सोलापूरातील प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सकाळी दहा वाजले पासून सोलापूर जिल्हा परिषदेसमोर विविध स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी विरोधी घोषणा देत आपला रोष व्यक्त केला .
खासदार आमदार यांच्या निधीतून दिव्यांगासाठी असलेला निधी मिळत नाही तसेच बाजारसमीतीत राखीव असलेल्या निधीचेही वाटप केले नाहीत अशा विविध स्थानिक पातळीवरील समस्येवर त्वरित उपाययोजना कराव्यात म्हणून जोरदार ” प्रहार ” करत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
पोलीस प्रशासना कडून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला सदर आंदोलनाची माहिती मिळाल्यावर तहसीलदार नदाफ यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्विकारून लवकरात लवकर सर्व विभागासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रहार दिव्यांग संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *