हिवाळी अधिवेशनानंतर सोलापूरातील प्रलंबित विषयांवर बैठक होणार

सोलापूर विकास मंचला पालकमंत्र्यांचे आश्वासन

सोलापूर : सोलापूर विकास मंच, वेकअप सोलापूर फाऊंडेशन, गिरीकर्णिका फाउंडेशनच्या यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरुन सोलापूरकरांचे मुलभूत प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवित असून गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी न लागल्याने सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे त्याच अनुषंगाने शनिवार दिनांक ०२ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकी दरम्यान प्रलंबित सोलापूरचे विषय येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.


या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान सोलापूर विकास मंचचे शिष्टमंडळ भेटले असता चंद्रकांत दादा पाटीलांनी हिवाळी अधिवेशन संपल्यावर तात्काळ सोलापूरच्या विकासाशी निगडित आणि प्रलंबित सोलापूर विकास मंचने मांडलेल्या सर्व विषयांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत बैठक लावा असे निर्देश त्यांचे ओएसडी बाळासाहेब यादव यांना दिले. ह्यावेळी मनिष देशमुख, शहाजी पवार, मोहन डांगरे यांचे सहकार्य या भेटी दरम्यान लाभले, सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले, विजय कुंदन जाधव, सुहास भोसले, आनंद पाटील, योगिन गुर्जर, अॅड.दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *