श्रीक्षेत्र बाळे येथे सोमवारपासून श्रीखंडोबा यात्रेस होणार प्रारंभ

विविध धार्मिक विधी व पालखी सोहळ्याचे आयोजन

सोलापूर : श्री क्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा यात्रेस सोमवार दि. 18 डिसेंबर 2023 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होणार आहे या निमित्ताने यात्रा काळात सोमवारी चंपाषष्ठी व तीन रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         बुधवार दि. 13 डिसेंबर 2023 रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे त्यानंतर चंपाषष्ठी निमित्त सोमवार दि. 18 डिसेंबर 2023 रोजी काकड आरती अभिषेक व महापूजा पालखी सोहळ्याने यात्रेस उत्साहात मंगलमय वातावरणात प्रारंभ होणार आहेत. यावर्षी यात्रेचे तीन रविवार असून पहिला रविवार दिनांक 24 डिसेंबर, दुसरा 31 डिसेंबर व तिसरा रविवार 7 जानेवारी रोजी यात्रा भरणार आहे पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 8 वाजता अभिषेक व महापूजा, सायंकाळी 8 वाजता अभिषेक व महापूजा, सायंकाळी 8.30 वाजता पारंपरिक वाद्यांसह घोडा, नंदीध्वजासह पालखी सोहळा संपन्न होणार आहे यात्रेची सांगता मंगळवार दि.16 जानेवारी 2024 बांगरषष्ठी ( बांगरसट ) रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मंदिरात सर्व मानकरी व भाविकांना महप्रसाद वाटप करून यात्रेची सांगता होणार आहे यात्रा कालावधीत सर्व मानकरी पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे व गावडे परिवार आदींचा सहभाग असतो.
या पत्रकार परिषदेस सागर पुजारी, बंडोपंत ढेपे, आदिनाथ पुजारी, कल्लेश्वर पुजारी आदी उपस्थित होते.

■■■
चंपाषष्टी (सट) सोमवार व तीन रविवार असे एकूण चार दिवस खंडोबाची यात्रा भरणार आहे दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी नाचणे, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ काढणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र या राज्यातून येतात शेवटच्या तिसऱ्या रविवारी रात्री 8 वाजता शोभेचे दारू काम होणार आहे. सोमपाच्या वतीने सिटी बस सेवा आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे यात्रा काळात दर्शनासाठी मंदिर दिवसभर खुले राहणार आहे देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी नेटके नियोजन व चांगली व्यवस्था करण्यात आली असल्याचेही अध्यक्ष विनय ढेपे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *