मन, मनगट आणि मेंदू बळकट होण्यासाठी खेळातील सहभाग महत्त्वाचा : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

आंतर महाविद्यालयीन जलतरण क्रीडा स्पर्धा संपन्न

सोलापूर √ प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या परिपूर्ण विकासासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अत्यंत गरजेची असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले मन, मनगट आणि मेंदू बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या खेळांत सहभाग घेणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन जलतरण क्रीडा स्पर्धा अशोक चौकातील मार्कंडेय जलतरण तलाव येथे यशस्वी संपन्न झाल्या अध्यक्षस्थानावरून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे बोलत होते. सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सोलापूर विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेतला प्रारंभी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रकाश काटूळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले सोलापूर शहर तसेच मंगळवेढा, बार्शी, माळशिरस, पंढरपूर परिसरातील एकुण नऊ महाविद्यालयांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी बोलताना प्रकाश काटूळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून खेळांकडे पाहणे गरजेचे आहे.यावेळी डॉ. रजनी दळवी, पार्वतय्या श्रीराम, श्रीकांत शेटे, डॉ. आनंद ढवण, श्रीकांत दोरनाल, अंबादास नादर्गी, गणेश जोरावर, प्रा. आनंद चव्हाण, ऋषिकेश यरगल आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्य देवराव मुंडे यांनी केले आभार प्रदर्शन भक्तराज जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *