माणुसकीच्या ऊबीत सामावले गेले ३७३ गरजवंत…!

महापुरुषांच्या विचारांचे पांघरून समाजमनावर घालण्याचे काम करू – श्रीकांत डांगे

सोलापूरातील रस्त्यावर झोपणाऱ्या गरजूंना थंडी पासून संरक्षण मिळावे म्हणून ३७३ लोकांच्या अंगावर प्रत्यक्ष घातले पांघरून दिली मायेची ऊब

सोलापूर √ नको असलेले द्या हवे असलेले घेऊन जावा या धर्तीवर कार्य करणाऱ्या सोलापूरातील माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने नानाविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. दर वर्षी प्रमाणे यंदाही थंडीच्या दिवसात रस्त्यावर झोपणाऱ्या गरजूंना थंडीपासून संरक्षण मिळावे या हेतूने रात्री ११ ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील एकूण ३७३ गरजूंच्या अंगावर ब्लँकेट, चादर, स्वेटर, टोपी, मोफलर व वाकळ आदी प्रत्यक्ष पांघरून घालून सेवा करण्यात आल्याची माहिती हिंदुराव गोरे सरांनी दिली.

या उपक्रमाचे उदघाटन संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत ( बापू ) डांगे यांच्या हस्ते तर इनर व्हील क्लब ऑफ सोलापूर स्टारलेट च्या अध्यक्षा काजल सिंदगी, आयेशा इनामदार, शिवाजी वाघमोडे, राहुल हुंडेकरी आदींची प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तर समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आला यावेळी मेकॅनिक चौक, रेल्वे स्टेशन, सात रस्ता, विजापूर रोड, सैफुल, जुळे सोलापूर, आसरा चौक, विकास नगर, गुरुनानक चौक, सत्तर फूट रोड, एमआयडीसी , अक्कलकोट रोड, सोना चांदी अपार्टमेंट विडी घरकुल, हैदराबाद रोड, बाजार समिती, जोशी गल्ली, राजेंद्र चौक, जोडबसवना चौक, दत्त चौक, लक्ष्मी मार्केट, सिध्देश्वर मंदीर परिसर आदी भागातील रस्त्यांवर झोपणाऱ्या गरजूंच्या अंगावर प्रत्यक्ष पांघरून घालण्यात आले.

या वेळी बोलताना संभाजी आरमार चे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मायेची उब दिली त्यांच्या कर्तुत्वानी आयुष्यातील थंडी दूर झाली त्या छत्रपतींच्या साक्षिने अश्या प्रकारचा वेगळा उपक्रम होत आहे आणि याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळतो हे निश्चित कौतुकास्पद आहे. आगामी काळात महापुनिश्चिता विचारांचे पांघरून समाजमनावर घालण्याचा काम करू असे मत या वेळी व्यक्त केले.

या उपक्रमासाठी मुकेश शर्मा, सोन्या मारुती गणपती महिला मंडळ, सोलापूर, बेनझीर काझी, नागेश पिसे, राजू वोरा, स्नेहा कुलकर्णी, शांतवीर स्वामी, प्रियांका व्हणशेट्टी, स्नेहल चलवादी, श्रीपाद कुलकर्णी, रामनिवास धूत, जसोदा तापडिया, राजेश हलकुडे, दीप्ती मुळे, वैभव यादव, राहुल हुंडेकरी, राहुल डिग्गे, योगिता उपरे, आशा वानारे, सीता सकट, भुमेश यनगंदुल, मंगेश जाधव आदींनी आपले योगदान दिले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिकेत चनशेट्टी, मल्लिनाथ शेट्टी, बेनझीर काझी, वैष्णवी क्षीरसागर, पूजा थोरात, सूरज रघोजी, कार्तिक कलबुर्गी, डोंगरेश चाबुकस्वार, अमोल गुंड, विघ्नेश माने, प्रेम भोगडे, राहुल हुंडेकरी, करण कलबुर्गी, अनिरुद्ध कदम, किशोर कलबुर्गी, समर्थ उबाळे, केदार दोड्डाळे, प्रतीक भडकुंबे, पुरशोत्तम काळे, भूषण पाटील, मनोज देशमुख, सिद्धेश्वर देशमुख, यशवंत हुंडेकरी, विशाल मैले, पवन आवार, आकाश मंत्री, श्रीनिवास पेंटा, अजय बिष्टा, चेतन गुडेली,ओंकार हगलगुंडे, ऋषिकेश घोडके, संतोष भद्रे, लक्ष्मीकांत निंबाळे, ओंकार अतनुरे, सिद्धिविनायक हिरजकर , रोहन मराठे, इरेश करजगी, कौशल चंडक, आकाश मुस्तारे, प्रज्वल निवर्गी, योगेश कबाडे, संतोष परचंडे, वृषभ गुमटे, अनिकेत गोरे, निखिल अंकुशे, शुभम पत्तेवार, जगदीश वासम, अखिलेश चिक्कळी, सुजल यळसंगी, वैभव यादव, रोहन चव्हाण, सिद्धार्थ जगताप, प्रणय उबाळे,पारस पाटील, रोहन सावंत, रवी चन्ना, सागर थोरात, मयूर यादगिरी, रतन मामड्याल आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *