एलबीपीएम’ महाविद्यालयातील तीन खेळाडूंची विद्यापीठ कबड्डी संघात निवड

प्रतीक्षा माळीस उपकर्णधार पदाची संधी

यशस्वी खेळाडू प्रतीक्षा माळी, शीतल मोटे, वैष्णवी चाबुकस्वार यांच्या समवेत प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, उपप्राचार्य प्रा. देवराव मुंडे, क्रीडा संचालक भक्तराज जाधव

सोलापूर √ सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील प्रतीक्षा माळी, शीतल मोटे, वैष्णवी चाबुकस्वार यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या महिला कबड्डी संघात निवड झाली आहे. प्रतीक्षा माळी हिला अष्टपैलू खेळाडू म्हणून उपकर्णधार पदाची संधी प्राप्त झाली आहे हा संघ मध्य प्रदेशातील बुंदेलखंड येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठीय महिला कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार आहे. या खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. भक्तराज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले खेळाडूंच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, उपप्राचार्य प्रा. देवराव मुंडे यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *