भारतीय कला प्रसार अकॅडमीतर्फे शनिवारी मोहम्मद रफी सौ साल – लता बेमिसाल  कार्यक्रमाचे आयोजन

डॉ कुमार करजगी यांना जीवन गौरव तर राधा मंगेशकर यांना कला गौरव पुरस्कार जाहीर !

सोलापूर √ भारतीय कला प्रसार अकॅडमीच्या वतीने शनिवार दि. 23 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे कला गौरव व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा तसेच स्वर्गीय मोहम्मद रफी सौ साल – लता बेमिसाल हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अकॅडमीचे संस्थापक गायक मोहम्मद अयाज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांना भारतीय कला गौरव पुरस्कार तर कामगार नेते डॉ कुमार करजगी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रिसिजन उद्योग समूहाचे अध्यक्ष यतीन शहा यांच्या हस्ते आणि श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. याप्रसंगी स्वर्गीय मोहम्मद रफी सौ साल – लता बेमिसाल हा संगीताचा कार्यक्रमही होणार आहे. भारतीय कला प्रसार अकॅडमीच्या वतीने यापूर्वी अभिनेत्री वर्षा उसगावकर, दिपाली सय्यद , हेमलता, उषा नाडकर्णी,  माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे यावेळी कला रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक गायक मोहम्मद अयाज यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस मंजुषा गाडगीळ, भाग्यश्री चव्हाण , अकबर शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *