‘ अंकुर साहित्य ‘ संघाचे राज्यस्तरीय संमेलन २३ व २४ डिसेंबर रोजी अकोल्यात

प्रतिनिधी √ साहित्य क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात अग्रेसर असणाऱ्या अंकुर साहित्य संघाचे ६१ वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन २३ व २४ डिसेंबर २०२३ रोजी गुरुकृपा मंगल कार्यालय जूने आर टी ओ रोड अकोला येथे आयोजित केले असून संमेलनाध्यक्ष पदी प्राचार्या डॉ साधनाताई निकम उद्घाटक प्रा डॉ संतोषजी हुशे तर स्वागताध्यक्षपदी ललितजी काळपांडे यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय उपाध्यक्ष भरतकुमार मोरे, जिल्हाध्यक्ष कवी नागनाथ गायकवाड यांनी दिली .
दोन दिवस चालणा-या या साहित्य संमेलनात साहित्याची भरगच्च मेजवानी असणार आहे २३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता उद्घाटन सोहळा होणार असून उद्घाटन सोहळ्यात डॉ पापालाल पवार डॉ सुगत वाघमारे डॉ श्रीकांतजी काळे किरण अग्रवाल विलास शेळके डॉ विनोद कोतकर रेखाताई शेकोकार डॉ प्रमोद काकडे शीलाताई गहिलोत तुळशीराम बोबडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत संमेलनात उद्घाटन सोहळा ,परिसंवाद निमंत्रितांचे कवी संमेलन ,उपस्थितांचे कवी संमेलन, गझल मुशायरा , महिलांचे कवी संमेलन, कथाकथन इत्यादी भरगच्च कार्यक्रम असणार आहे संमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत प्रतिनिधींची निवास व भोजनाची व्यवस्था निःशुल्क केलेली आहे संमेलनात अंकुर वाडमय पुरस्कार अंकुर रत्न पुरस्कार , अंकुर मित्र पुरस्कार स्व.अरविंद भोंडे स्मृती हास्य सम्राट पुरस्कार , स्व.सुरेश लांडे स्मृती साहित्य सेवा पुरस्कार हे सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मान पुर्वक प्रदान करण्यात येणार आहेत
या साहित्य संमेलनाला साहित्य व रसिक यांनी आवर्जून उपस्थित राहून संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिंमत ढाळे उपाध्यक्ष भरतकुमार मोरे कार्यवाह तुळशीराम बोबडे सहकार्यवाह वासुदेव खोपडे निमंत्रक प्रा सदाशिव शेळके सहनिमंत्रक डॉ मनोहर घुगे समन्वयक प्रा संजय कावरे सहसमन्वयक प्रा मोहन काळे व प्रसिद्धी प्रमुख राजेश काटोले यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *