राज्यस्तरीय कराटेत अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीने गाठले सुवर्ण…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीच्या विजयी स्पर्धकां सोबत मुख्य कराटे प्रशिक्षिका शिहान अनुराधा थोरात

सोलापूर √ लातूर येथे नुकतेच पार पडलेल्या दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सोलापूरच्या अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्पर्धकांनी 8 सुवर्ण, 9 रौप्य,7 कांस्यपदक पदके अशी एकूण 24 घसघशीत पदके मिळवत स्पर्धेतील प्रथम क्रमांकचे सांघिक चषक पटकाविले आहे. सर्वांना मुख्य कराटे प्रशिक्षिका आंतरराष्ट्रीय पंच शिहान अनुराधा महादेव थोरात (ब्लॅक बेल्ट 5th डिग्री) यांचे मार्गदर्शन लाभले आहे सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील 600 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे – काता प्रकारात निरंजन विकास हनगंडी, माहीर सुनिल सिकवेरा,अध्या सागर एकबोटे, अक्षरा विजय पंडिल्ला, प्रतिक्षा बाबू सुंकारे यांनी सुवर्णपदक पदक पटकाविले तर मयुरेश नरसय्या गुंटुक, रोहितवर्धन सोमनाथ बुगडे, श्रीहिता महेश येमूल, समीक्षा समाधान राऊत, सिंधुजा गणेश सिंगम आणि अस्था इगल नलावडे यांनी रौप्यपदक पटकाविले तसेच विरेंद्र रविंद्र भिमनपाल्ली, कौशिक सचिन गादा, समृद्धी शिवराज तोग्गी यांनी कांस्यपदक पटकाविले आहे.
कुमिते प्रकारात- निरंजन हनगंडी, अक्षरा पंडिल्ला, समृद्धी तोग्गी यांनी सुवर्णपदक तर विरेंद्र भिमनपल्ली, श्रीहिता येमूल, प्रतिक्षा सुंकारे यांनी रौप्यपदक तर मयुरेश गुंटुक,कौशिक गादा,समीक्षा राऊत,अस्था नलावडे यांनी कांस्य पदक पटकविले आहे या सर्व विजेत्या स्पर्धकांची जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *