हिंदुराष्ट्र सेनेकडून रविवारी विराट ‘हिंदू गर्जना सभा’

हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाई सभेला करणार संबोधित

सोलापूर √ हिंदुराष्ट्र सेना सोलापूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी श्री शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने विराट हिंदू गर्जना सभेचे आयोजन रविवार दि. 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता कर्णिक नगर मैदान येथे करण्यात आले आहे या सभेला हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई हे संबोधित करणार असल्याची माहिती हिंदुराष्ट्र सेना शहरप्रमुख रवि गोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.विश्व हिंदू परिषदेचे पूर्व जिल्हाध्यक्ष ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण, हिंदुराष्ट्र सेना महिला आघाडीचे हर्षा ठाकूर यांचेही मार्गदर्शन होणार आहे. राष्ट्रभक्त उद्योजक बाबुभाई मेहता, सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
जातीपातीत विभागलेला हिंदू संघटित करणे हा सभेचा मुख्य उद्देश असून भारताला हिंदुराष्ट्र घोषित करण्याची मागणीही सभेतून करण्यात येणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामलल्ला विराजमान होणार आहेत, यानिमित्ताने अयोध्येहून आलेल्या ‘मंगल अक्षता कलशा’च्या दर्शनाची व्यवस्थाही सभेच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शहर संघटक आनंद मुसळे यांनी यावेळी केले या सभेची जोरदार तयारी करण्यात येत असून बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्ते घरोघरी संपर्क करत आहेत.
या पत्रकार परिषदेला उपसंयोजक विलास पोलू, श्रीकांत सुरवसे, रोहन सोमा, उपमहानगर प्रमुख लिंबाजी जाधव, अभिजित अरळीकर, ओंकार दोडतले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *