लोकमंगल विवाह सोहळ्यात ५२ जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

सोलापूर √ गोरज मुहुर्तावर ५२ जोडपी कपाळाला बाशिंग बांधून मंचावर आली… लगीन घाई सुरु…आयुष्यभर साथ देण्यासाठी… त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या लोकमंगल फौंडेशन आयोजित अखंडीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात,अठराव्या अक्षता सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवरही उपस्थिती होते.
आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ३१ डिसेंबर रोजी विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरुनगर (डी. एड. कॉलेजच्या) मैदानावर हजारो मान्यवरांच्या उपस्थिती पार पडला या विवाह सोहळ्यात ५२ नववधू – वरांनी रेशीमगाठी बांधल्या.

सकाळी सर्व वधू- वरांना समुपदेशन करण्यात आले वधू- वरांना मान्यवरांच्या हस्ते शालू,वरपोषाखासह रुखवत साहित्य देण्यात आले विवाह सोहळ्यामध्ये शासकीय योजनांची माहिती देणारे दालन उभारण्यात आले होते. रक्तदान शिबिरही घेण्यात आले अक्षतापूर्वी वधू – वरांची उघड्या बग्गीमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधूवरांच्या पालक तसेच नातेवाईकांना उत्कृष्ट जेवणावळीची व्यवस्था करण्यात आली होती .
यावर्षीही विवाह सोहळ्यात आ. सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनी प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीच्या कपड्यांसह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी ५ नग, बालकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य देऊन एका वधूचे कन्यादान करून इतर ५१ वधूंचा कन्यादान करण्याचा सन्मान इतर मान्यवरांना देण्यात आला.
या लग्नसोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, पंचाक्षरी महास्वामी,आ.सचिन कल्याणशेट्टी, लोकमंगल फौंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, मनीष देशमुख, मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज,सिद्दलिंग शिवाचार्य महाराज, पंचाक्षर शिवाचार्य महास्वामी (पान मंगरूळ) पंचाक्षर शिवाचार्य महास्वामी (माळकवठे), अभिनव बसवलिंग महास्वामी, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी नागणसूर, सद्गुरू सोमलिंग महाराज, नीलकंठ शिवाचार्य महाराज, महांतेश हिरेमठ महास्वामी, बसवराज शात्री, शिवयोगी शात्री, ईश्वरानंद महास्वामी, गहनीनाथ औसेकर महाराज, लक्ष्मण महाराज, सुधाकर महाराज इंगळे,ज्योतिराव चांगभले महाराज, विष्णुपंत मोरे महाराज, बळीराम जांभळे महाराज, ह.भ.प.संजय केसरे, महाराज, ह.भ.प. अभिमन्यू डोंगरे महाराज, नरेंद्र काळे , अमर बिराजदार सभापती गुरुसिद्ध मेह्त्रे, डॉ. चनगोंडा हवीनाळे, शशी थोरात, महेश देवकर, श्रीनिवास करली , भाजपचे दक्षिण तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, सचिन चव्हाण, संगीता जाधव, मनिषा हुच्चे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

⏹ ⏹ ⏹
आ. देशमुख यांच्याकडून सातत्य शिकावे : पालकमंत्री
आ.सुभाष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांकडून सातत्य सर्वांनी शिकण्यासारखे आहॆ. गेल्या १८ वर्षांपासून ते सामूहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम राबवत आहेत़. घरातीलच कार्य म्हणून आणि आपल्या मुलीचे लग्न आहॆ हे समजून ते हे कार्य करतात मला त्यांचा हेवा वाटतो अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विवाह सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

⏹ ⏹ ⏹ शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न करू : आ. देशमुख

आपण या समाजात जन्मलो आहे त्यामुळे समाजाचे ऋणी लागतो म्हणून लोकमंगल परिवार जनतेबरोबर असून लोकमंगलच्या या प्रयत्नाला सर्वांनी साथ द्यावी. सर्वांची साथ मिळाल्यास शेवटच्या माणसाचेही अश्रू पुसण्याचे काम आपण करू त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक होईल, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी विवाह सोहळ्याप्रसंगी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *