सोलापूर शहरात कोरोनाचा पहिला बळी ! 

देगाव परिसरात आढळला एक कोरोना बाधित रुग्ण

२ रुग्ण बरे झाले आता ७ रुग्ण ऍक्टिव्ह

प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून प्रभावी उपाययोजना

सोलापूर √ गेल्या दोन वर्षांपूर्वी कोविड-१९ या जीवघेण्या आजाराने हैदोस घातल्यानंतर आता पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरियंट जेएन-१ या आजाराने देशात शिरकाव केला आहे. सोलापूर शहरात नव्या व्हेरियंट जेएन-१ या या आजाराचा रुग्ण आढळला नाही मात्र शहरात कोविड -१९ चे सध्या एकूण सात रुग्ण उपचार घेत आहेत तर मंगळवारी एका रुग्णाचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह निघाला आहे दि.३१ डिसेंबर रोजी एका वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
         दरम्यान, भवानी पेठ परिसरातील ७२ वर्षीय वृद्धाचा कोरोना – १९ आजाराने शहरातील पहिला बळी घेतला आहे. या रुग्णास रक्तदाब मधुमेहचा आजार होता शिवाय त्यांच्यावर बायपास सर्जरी देखील झालेली होती. या आजारपणात त्यांना सारखे झटके येत असल्याने रूग्णाच्या नातेवाईकांनी सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळून आले होते त्यांच्यावर उपचार सुरू असताना ३१ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची व या संदर्भात रुग्णालयाकडून मृत्यू अहवाल देखील प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी यांनी दिली. जे.एन.१ या नव्या व्हेरीएन्टचा हा रुग्ण होता का हे अद्याप समजले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दिवसभर केलेल्या कोरोना चाचण्यातून देगाव शिवारातील नव्याने आणखी एक बाधित रुग्ण आढळून आला आहे. यामुळे खबरदारीच्या उपाययोजना घेण्यासंदर्भात सोमपा प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. शहरात दिनांक २२ डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट  माध्यमातून पसरली आहे यादरम्यान आतापर्यंत तेरा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर यामधील एकाचा मृत्यू झाला आहे ४ रुग्ण तातडीच्या उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर शहरातील शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात ५ पुरुष आणि २ महिला असे ७ बाधित रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत.
सोमवारी दिवसभरात विविध रुग्णालयात आलेल्या संशयित १४ रुग्णांची कोरोना चाचणी तपासणी करण्यात आली यामध्ये १३ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले मात्र देगाव परिसरातील एका पुरुष रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे सोमपा आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत याशिवाय अन्य गर्दीचे प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत जेष्ठ नागरिकांना मास्क सक्तीचे करण्यात आले आहेत. 
शहरातील महापालिकेसह खाजगी रुग्णालय देखील विविध उपायोजनांसह रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज झाले असून त्यांना प्रशासनाने विविध सूचना दिल्या आहेत. 
सध्या देशभरात जे.एन.१ या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला आहे याचे परिणाम सौम्य असल्याने घाबरुन जाण्याचे कारण नाही मात्र प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे सोलापूरात कोरोना झालेल्या रुग्णांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवले आहेत त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही असेही डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले.

लक्षणे दिसताच नागरिकांनी तपासणी करावी 

कोरोनाच्या या अनुषंगाने महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून सर्व त्या विविध उपाय योजना आखण्यात आले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात गोळ्या औषध देखील उपलब्ध आहेत. शिवाय रुग्ण उपचारासाठी आल्यास त्याचे नियोजन ही करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांमध्ये टेस्टिंग उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी पण संशयित रुग्णांनी या संदर्भात संपर्क साधून कोरोनाच्या चाचण्या वेळीच करून घ्याव्यात. कोणीही अंगावर काढू नये आजारी रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन सोमपा प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *