राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने शनिवारी ट्रस्टी संवाद कॉन्फरन्स

सोलापूर √ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी [अजित पवार] महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण, आरक्षण, संरक्षण व वफ्फ संस्थाच्या प्रश्नावर शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल बालाजी सरोवर,आसरा चौक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर ट्रस्टी संवाद कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असणार आहेत यावेळी प्रमुख उपस्थितीत आ. बबनदादा शिंदे, आ. यशवंत माने, आ. संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे, राज्य प्रमुख इद्रिस नाईकवाडी, मुख्य प्रवक्ता उमेश पाटील, प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी अल्पसंख्याक संस्थांचा उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी व वफ्फ संस्था (दर्गा, मस्जिद, ईदगाह, मदरसा व कब्रस्तानचे ट्रस्टी) सामाजिक संघटनांचे पदाधिकारी समाजाचे प्रश्न व समस्या लिखित स्वरूपात सादर करावे. या ट्रस्टी संवाद कॉन्फरन्स मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष अमीर शेख, कार्याध्यक्ष रियाज शेख, समन्वयक संजू मोरे, शफी इनामदार, महंम्मदगौस मुजावर, वैभव गंगणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *