एमआयटी – ‘ राष्ट्रीय सरपंच संसद ‘ महाराष्ट्र प्रदेश – सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नागेश कोकरे

सोलापूर : ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्या कार्यविस्तारासाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सामाजिक क्षेत्रात व विशेषतः ग्रामविकास क्षेत्रात भरीव कार्य करीत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींची सर्वांगीण कार्याची माहिती घेऊन या पदासाठी निवड करण्यात येते. एमआयटी – ‘ राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष या पदासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नागेशजी कोकरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड गावचे सुपुत्र उत्तम वक्ते ,उत्कृष्ट खेळाडू म्हणून परिचित असलेले अष्टपैलू व्यक्तीमत्व नागेश कोकरे हे खेडचे विद्यमान उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे संस्थापक राहुलदादा कराड, प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाशराव महाले,राज्य कार्यवाह व्यंकटेश जोशी, राज्य संघटक डॉ नामदेवराव गुंजाळ,ग्रामविकासतज्ञ समिती समन्वयक बाजीराव खैरनार, पुणे विभाग अध्यक्ष रवींद्र पाटील, पुणे विभाग संघटक प्रा.सुहास पाटील, पुणे विभाग महिला समन्वयक श्रीमती भक्तीताई जाधव, पुणे विभाग महिला संघटक ( ग्रामीण विभाग ) सौ.संगीताताई साळुंखे, पुणे विभाग महिला संघटक सौ.वैशालीताई शिंदे ( शहर विभाग ), सोलापूर जिल्हा महिला समन्वयक सौ.प्रगतीताई तिवारी, सोलापूर जिल्हा महिला संघटक सौ.वंदनाताई बुरडे,सोलापूर जिल्हा महिला सहसमन्वयक सौ. श्रद्धाताई अध्यापक व सोलापूर जिल्हा महिला सहसंघटक सौ. अंजलीताई गुरव तसेच सरपंच संसदेचे सोलापूर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे पदाधिकारी यांनी नागेशजी कोकरे यांचे या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *