धर्मस्थळ हत्तरसंगकुडलची बस सुरू तर बीबीदारफळची बसही सुरू होणार पूर्ववत

सोलापूर : दक्षिण सोलापूरातील हत्तरसंगकुडल येथील शिवमंदिर व संगमस्थान असल्याने सदर धार्मिक व पर्यटनस्थळी अधिक महिना व श्रावणमास असल्याने शहरातील नागरिकांकरीता सिटीबसची सोय व्हावी याकरीता सतत मागणी केली जात असल्याने सोलापूर शहर व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांच्या सोयीसाठी गुरूवार दि. २७ जुलैपासून मार्ग क्र. ९१ – बी राजेंद्र चौक ते हत्तरसंगकुडल या मार्गावर निदान श्रावण महिन्यापर्यंत तरी का होईना सोलापूर परिवहन मंडळाने ( SMT ) उपरोक्त बससेवा सुरू केलेली आहे .
भाविभक्तांकरीता तसेच हत्तरसंगकुडल येथील स्थानिक ग्रामस्थ व या मार्गावरील टाकळी, नांदणी, बरूर येथील नागरिकांची मागणी व गरज लक्षात घेवून गुरुवारी २७ जुलैपासून सकाळी ८.०० वा. व दुपारी ३.४५ वा. राजेंद्र चौक येथून हत्तरसंगकुडल पर्यंत दैनंदिन बसची सोय करण्यात आली असून शहर व ग्रामीण भागातील भाविकभक्तांनी व सदर मार्गावरील प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करत याचबरोबर दि ३१/०७/२०२३ पासून मार्ग क्र. ७५ राजेंद्र चौक ते बीबीदारफळ ही बससेवा देखील पूर्ववत चालू करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर परिवहनचे व्यवस्थापक मल्लिकार्जुन पडगानूर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *