जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्राचे झाले वितरण

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याचा शुभारंभ आज बाळे तलाठी कार्यालयात सोलापूरचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आले.
महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढून विविध प्रकारचे दाखल्यांची पूर्तता करण्यासाठी तसेच विविध समस्यांचे निरसन करून पारदर्शी व्यवहार पार पडावेत हा महसूल सप्ताह आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असून या सप्ताहाव्यतिरिक्त ही कायमस्वरूपी जिल्हा प्रशासन हे नागरिकांसाठी कर्तव्य पार पाडण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नाॅन क्रिमिनल प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार उत्पन्न दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र,फेरफार, सातबारा उतारे , श्रावणबाळ उत्पन्न दाखला तसेच शालेय उत्पन्न दाखले वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमास एसडीओ सदाशिव पडदुने , तहसीलदार सैफन नदाफ, बाळे सजा मंडल अधिकारी संतोष कांबळे ,तलाठी श्रीमती वर्षा थोरात, कोतवाल राहुल तोडकरी, माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी माजी सरपंच सुनील पाटील, किशोर पाटील,बिज्जू प्रधाने, सुरेश तोडकरी,नागनाथ क्षीरसागर ,मदन क्षीरसागर यांच्यासह बाळे परिसरातील लाभधारक नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *