घरफोडीतील १२ तोळे सोने व चोर झाला हस्तगत

सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे, गुन्हेशाखा पथकाची कामगिरी

सोलापूर : सोलापूरातील मल्हारी दत्तु मस्के रा.बुधवार पेठ, मिलींद नगर, यांच्या घरात ३ मे रोजी चोरी झाली होती साधारण दोन महिन्यानंतर उपरोक्त फिर्यादीच्या लक्षात आले की घरातील बेडरूम मधील कपाटात ठेवलेले १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे कळल्यावर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरूद्ध फिर्याद दाखल केली होती सदर गुन्हयाचा तपास करत असताना दि. २६ जुलै रोजी गुन्हेप्रकटीकरण पथकाने आरोपी यतीराज किशोर गायकवाड वय – २५ वर्षे, रा. धरमशी लाईन मनोहर नगर झोपडपट्टी, मुरारजी पेठ, सोलापूर याला ताब्यात घेऊन याचेकडुन सदर गुन्हयातील एकुण चोरी झाले पैकी १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करून घरफोडी उघडकीस आणली सदर आरोपी हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तरी नागरिकांनी अशाप्रकारे गुन्हे करणारे आरोपींपासुन सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे सहा. पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, वपोनि विश्वनाथ सिद, दुपोनि.विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांचे बरोबर रविंद्र परबत, प्रविण चुंगे, आया बागलकोटे,अर्जुन गायकवाड, कृष्णा बडुरे, विनोद व्हटकर, नितीन मोरे, सचिनकुमार लव , अजय चव्हाण, अमोल खरटमल, शशिकात दराडे, नागनाथ गुळवे,तौसीफ शेख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *